अनेकदा कोकणातील आपल्या गावी गेल्यानंतर तिथे काही कामानिमित्त बाहेर जायचं म्हटलं की, कार कुठून आणायची असा प्रश्न पडतो मात्र आता हे टेन्शन लवकरच संपणार आहे. तुम्ही आता ट्रेनने तुमची कारदेखील नेऊ शकता. कोकण रेल्वेने रो-रो सेवा सुरू केली आहे. त्यामुळं प्रवाशांचा वेळ आणि खर्चदेखील वाचणार आहे.
रो-रो सेवा ही कोलाड ते गोव्याच्या वेर्णेपर्यंत असणार आहे. सध्या ही सेवा कोकण रेल्वे मार्गावरील निवडक स्थानकांवर उपलब्ध आहेत. यात गोव्याच्या मुख्य स्थानकांचाही समावेश आहे.