मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यातून निर्दोष मुक्तता झाल्यानंतर साध्वी प्रज्ञा यांनी माध्यमांशी संवाद साधताना आपण 17 वर्षे अपमान सहन केल्याचं सांगितलं. त्याचवेळी स्वतःच्या देशात आम्हाला दहशतवादी बनवण्यात आल्याची खेदजनक प्रतिक्रिया दिली.
‘मला 13 दिवस टॉर्चर करण्यात आलं. माझं आयुष्य उध्वस्त झालं. मी संन्यासा आहे म्हणून कदाचित मी जिवंत आहे, पण मी दररोज मरत होते. आज मात्र मला आनंद झाला आहे, कोण तरी आहे जो माझा आवाज ऐकत आहे. हिंदुत्व आणि भगव्याचे आज विजय झाला आहे’, असं म्हणत त्यांनी निकालानंतर पहिली प्रतिक्रिया दिली.