बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानच्या भोपाळमधील संपत्तीचा गेल्या अनेक दिवसांपासून वाद सुरु होता. १५ हजार कोटींच्या भोपाळमधील ऐतिहासिक संपत्तीबाबत आता मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने मोठा निर्णय जाहीर केला आहे. या प्रकरणी न्यायालयाने अभिनेता सैफ अली खान व त्याची बहीण सोहा आणि सबा आणि आई शर्मिला टागोर यांना भोपाळमधील संपत्तीचे वारस घोषित करण्यास न्यायालयाने नकार दिला आहे. त्याचे आदेश न्यायालयाने फेटाळून लावले असून ही संपत्तीबाबत न्यायालयाने कोणता निर्णय घेतला आहे.
मध्य प्रदेश न्यायालयाने भोपाळमधील असणारी संपत्ती ही शत्रूची संपत्ती असल्याचं घोषित केलं आहे. त्यामुळे सैफ अली खानच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. यामध्ये सैफ अली खानचे लहानपणीचे घर, नूर उस सबा पॅलेस, दार उस सलाम, हबीबीचा बंगला, कोहेफिजा प्रॉपर्टी आणि अहमदाबादच्या एका पॅलेसचा समावेश आहे. न्यायालयाने सैफ अली खानची वडिलोपार्जित संपत्ती ही शत्रूची संपत्ती असल्याचं म्हणत सरकारच्या ताब्यात दिली आहे.