संजय राऊतांनी काँग्रेसला सुनावले खडे बोल! म्हणाले…

महाराष्ट्रात काँग्रेस मित्रपक्षांशी ज्या पद्धतीने वागली त्याचा निकाल विधानसभेत दिसला. आपल्याला मोदी-शहांच्या भाजपला हरवायचे आहे, आपल्याच गोतावळ्यातील मित्रांना नाही’, अशा शब्दात शिवसेनेचे (यूबीटी) खासदार संजय राऊत यांनी काँग्रेसवर निशाणा साधला. अलिकडेच काँग्रेसचे राष्ट्रीय अधिवेशन गुजरातमध्ये पार पडले. या अधिवेशानातील मुद्द्यावर आणि भूमिकांवर बोट ठेवत राऊतांनी  काँग्रेसवर टीका केली.  

“मोदी-शाहांना त्यांच्याच जमिनीवर जाऊन आव्हान देण्याचा हा प्रयत्न चांगला आहे, पण त्यामुळे भारतात खरेच राजकीय क्रांती होईल काय?”, असा सवाल राऊतांनी काँग्रेसला केला आहे. 

राऊतांनी पुढे म्हटलं आहे की, “2024 च्या सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेसने शंभर जागा जिंकल्या. इंडिया आघाडीने मोदींना 240 वर रोखले, पण इंडिया आघाडीला सत्ता मिळवता आली नाही. ज्या गुजरातच्या भूमीवरून काँग्रेसने मोदींना आव्हान दिले, त्या राज्यात काँग्रेस लोकसभेची एकही जागा जिंकू शकली नाही. मध्य प्रदेश, आंध्र प्रदेशातही काँग्रेसला मेहनत घेण्याची गरज आहे. महाराष्ट्रात लोकसभेत यश मिळाले, पण विधानसभेत मोठे अपयश पदरी पडले. त्यास भाजपचे घोटाळे जितके कारणीभूत आहेत, तेवढेच काँग्रेसअंतर्गत काही विषय जबाबदार आहेत. त्यावर मंथन झाले पाहिजे”, असे खडेबोल राऊतांनी काँग्रेसला सुनावले आहेत. 

लोकसभेच्या निकालानंतर ‘इंडिया आघाडी कोठे आहे?’ असे प्रश्न विचारले जातात. त्या प्रश्नांना काँग्रेसने गुजरातच्या अधिवेशनातून उत्तर देणे गरजेचे होते. इंडिया आघाडीचे काय झाले? ती जमिनीत गडप झाली की हवेत विरून गेली? नक्की काय झाले? याचे उत्तर देण्याची जबाबदारी काँग्रेस अध्यक्षांवर आहे”, असे म्हणत राऊतांनी काँग्रेसला घेरले. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here