संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून टाकणाऱ्या संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी संबंधित महत्त्वाची माहिती समोर आली आहे. मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण केल्यानंतर त्यांना मारण्यासाठी ४ जीवघेण्या शस्त्रांचा वापर करण्यात आला, असा परीक्षण अहवालात उल्लेख करण्यात आला आहे. हा अहवाल न्यायालयामध्ये सादर करण्यात आला आहे. या सर्व प्रकरणांमध्ये हा अहवाल अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.
सरपंच संतोष देशमुख यांना मारहाण करण्यासाठी वापरलेल्या चार हत्यारांचा परीक्षण अहवाल समोर आला, ज्यात गॅसचा पाईप, पाईपचा चाबूक, लाकडी बांबूची काठी आणि लोखंडी पाईपचा समावेश आहे. या हत्यारांनी मारहाण झाली तर, एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो, असे अहवालात नमूद करण्यात आले. महत्त्वाचे म्हणजे, आरोपींनी याआधी देखील इतर व्यक्तींना मारहाण करण्यासाठी याच हत्यारांचा वापर केल्याचे समजत आहे. हा अहवाल न्यायालयामध्ये सादर करण्यात आला आहे, जो संतोष देशमुख यांना न्याय मिळवून देण्यासाठी महत्त्वाचे ठरू शकतो.