दिशा सालियनप्रकरणी वकील आज मालवणी पोलिस ठाण्यात

दिशा सालियनचे वडील सतीश सालियन यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत दिशा सालियन मृत्यू प्रकरणाची चौकशी केंद्रीय अन्वेषण विभागाद्वारे (सीबीआय) करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, सतिश सालियन यांचे वकिल अभिषेक मिश्रा आणि ईश्वर अग्रवाल हे आज मालवणी पोलीस ठाण्यात गेले होते.

अभिषेक मिश्रा म्हणाले, “पोलिसांकडे असलेले कागदपत्रे आम्ही आज मागायला आलो होतो. त्यांच्याकडे असलेले फॉरेन्सिक रिपोर्ट, डायरी, सीसीटीव्ही फुटेज, कॉल डेटा रिपोर्ट देण्याची आम्ही पोलिसांकडे मागणी केली आहे. आज ते पोस्टमार्टम रिपोर्ट देणार आहेत. बाकीचे कागदपत्रे सोमवारी देणार आहेत. कोर्टात हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने आम्ही तिथे या कागदपत्रांच्या आधारांवर स्ट्राँग भूमिका घेणार आहोत.”

मुंबई उच्च न्यायालयाच्या वेबसाइटवरील केस स्टेटसनुसार, २१ मार्च रोजी वकील अभिषेक मिश्रा यांच्यामार्फत दाखल केलेली याचिका २ एप्रिल रोजी न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे आणि नीला के गोखले यांच्या खंडपीठासमोर सुनावणीसाठी स्वयंचलितपणे सूचीबद्ध आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here