बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खानने एका मुलाखतीमध्ये काश्मीरबद्दलच्या आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. शाहरुखने या मुलाखतीमध्ये आपण कधीच काश्मीरला का गेलो नाही याबद्दलची एक भावनिक आठवण सांगितलेली. खास करुन पहलगाम आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये तो का गेला नव्हता याबद्दल त्याने भाष्य केलं. विशेष म्हणजे त्याने हे महानायक अमिताभ बच्चन यांच्यासमोर बसून सांगितलं होतं.
कौन बनेगा कोडपती’ या रिअॅलिटी शोच्या एका विशेष भागामध्ये शाहरुख खान सहभागी झाला होता. कार्यक्रमाचे होस्ट अमिताभ बच्चन यांच्यासमोर शाहरुख ‘जब तक है जान’ चित्रपटाच्या प्रमोशननिमित्त हॉट सीटवर बसलेला. शाहरुखने त्याचे आई वडील काश्मिरी असूनही तो कधी काश्मीरला का गेला नाही याबद्दल एक भावनिक आठवण सांगितलेली. शाहरुख अवघ्या 15 वर्षांचा असताना त्याच्या वडिलांचं निधन झालं. मात्र त्यापूर्वी त्यांनी काश्मीर पाहण्याची इच्छा व्यक्त केली होती. “माझे आई वडील काश्मिरी होते,” असं शाहरुखने अमिताभ यांना सांगितलं.
“एकदा त्यांनी मला बोलता बोलता आयुष्यात कोणकोणती ठिकाणं आयुष्यात मी एकदा तरी पाहिली पाहिजेत याबद्दल सांगितलं होतं. तीन जागा मी पहाव्यात असं त्यांना वाटत होतं. इस्तांबूल, इटली आणि काश्मीर! मी यापैकी पहिल्या तीन जागा ते नसताना पाहिल्या आहेत. मात्र ते माझ्यासोबत नसताना मी काश्मीर पाहू नये असं मला वाटतं,” असं शाहरुखने सांगितलं.