शेअर बाजार कोसळला, ३ कोटी रुपयांचा चुराडा

इराण आणि इस्रायल संघर्ष पेटला आहे. अमेरिकेने इराणवर केलेल्या हल्ल्यानंतर इराणने तेलपुरवठा करणा-या जहाजांसाठी अत्यंत महत्त्वाची असलेली अरुंद होर्मुझची सामुद्रधुनी बंद करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. यामुळे निम्म्या जगावर इंधन तुटवड्याचे व दरवाढीचे संकट येऊ शकते. या निर्णयामुळे शेअर बाजारात मोठा धमाका झाला. फक्त १५ मिनिटांत ३ कोटी रुपयांचा चुराडा झाला आहे.

पर्यायी मार्ग आणि तेलाचा तुटवडा यामुळे कच्च्या इंधनतेलाचे सध्या असलेले ७५ डॉलर प्रति बॅरल हे दर थेट १२० ते १३० डॉलरपर्यंत जाऊ शकतात.

युद्धामुळे बिघडलेल्या परिस्थितीचा परिणाम आज शेअर बाजारावर दिसून आला. केवळ आशियाई शेअर बाजारच नाही तर भारतीय शेअर बाजारही कोसळला. सोमवारी भारतीय शेअर बाजारामध्ये मोठी घसरण झाली. सेन्सेक्स आणि निफ्टी ५० दोन्हीही उघडताच घसरले. सकाळी ९.४० वाजता बीएसई सेन्सेक्स ८०७ अंकांनी घसरून ८१,५९९ वर पोहोचला. निफ्टी २१७ अंकांनी घसरून २४,८९५ वर पोहोचला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here