पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी दिग्गज खेळाडू शोएब अख्तरवर मोठी कारवाई केली आहे. केंद्र सरकारने शोएब अख्तरचं युट्यूब चॅनेल ब्लॉक करण्याचा निर्णय घेतला आहे.
क्रिकेट सामन्यांचं विश्लेषण आणि जागतिक क्रिकेटवर नेहमी भाष्य करत असल्याने शोएब अख्तर भारतातही लोकप्रिय आहे. केंद्र सरकारने फक्त शोएब अख्तरवर कारवाई केली नसून, त्याच्यासह इतर १६ इतर चॅनेल्सवरही कारवाई करण्यात आली आहे. बंदी घातलेल्या प्लॅटफॉर्म्सचे एकत्रितपणे सुमारे ६.३ कोटी सबस्क्रायबर्स आहेत. त्यात डॉन न्यूज, समा टीव्ही, एआरवाय न्यूज, बोल न्यूज, रफ्तार, जिओ न्यूज आणि सुनो न्यूज सारख्या प्रमुख पाकिस्तानी न्यूज चॅनेलचा समावेश आहे.