श्रीकांत शिंदे यांनी केला ८०० कोटीचा घोटाळा, संजय राऊत यांचा आरोप

झारखंडमधील मद्य घोटाळ्यात सुमित फॅसिलिटीचा संचालक अमित साळुंखे याला अटक करण्यात आली आहे. अमित साळुंखे छत्तीसगडमधील मद्य व्यावसायिक सिद्धार्थ सिंघानियाचा निकटवर्तीय असून त्याच्या चौकशीच्या आधारेच ही कारवाई करण्यात आली आहे. लाचलुतपत पथकाने रांचीमध्ये ही कारवाई केली आहे. दरम्यान अमित साळुंखेचा महाराष्ट्रातील ८०० कोटींच्या रुग्णवाहिका घोटाळ्यातही समावेश आहे असा आरोप संजय राऊतांनी केला आहे. तसंच अमित साळुंखे श्रीकांत शिंदे फाऊंडेशनचा कणा असून, सगळे पैसे शिंदेकडे वळवलं असल्याचा गंभीर आरोप राऊत यांनी केला आहे.

“फडणवीस यांना वाकण्याची गरज नाही तरी देखील ते वाकले आहेत. झारखंडमधून एक टोळी आली. अमित साळुंखे यांना अटक केली. सुमित फॅसिलिटी काय आहे? जरा चौकशी करा. 800 कोटींचा घोटाळा महाराष्ट्रमध्ये झाला. 108 नंबर ॲम्ब्युलन्ससंदर्भात आहे. 650 कोटींनी टेंडर वाढवले. अमित साळुंखे श्रीकांत शिंदे मेडिकल फाउंडेशनचे आहेत. हे सगळे पैसे श्रीकांत शिंदे फाउंडेशनकडे वळवले,” असा आरोप राऊत यांनी केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here