सध्या सुरु असलेल्या भारत-पाकिस्तानात तणावाच्या पार्श्वभूमीवर देशभरात सतर्कता बाळगली जात आहे. म्हणूनच आता सिद्धिविनायक मंदिर प्रशासनानेही मोठा निर्णय घेतला आहे. मंदिर प्रशासनाने सुरक्षेच्या कारणास्तव आजपासून भाविकांना हार आणि नारळ अर्पण करण्यास मनाई केली आहे. या निर्णयाला भाविकांनी सहकार्य करावे, असे आवाहनही मंदिर प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
सिद्धिविनायक मंदिरापाठोपाठ शिर्डीच्या मंदिरातही हा नियम लागू करण्यात आला आहे. शिर्डीमध्ये आजपासून हार, फुलं, प्रसाद नेण्यास बंदी असणार आहे. शिर्डी साई संस्थाननं हा निर्णय घेतला आहे. भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवरच शिर्डी साई संस्थाननं हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.