राष्ट्रपतींच्या संसदेतील अभिभाषणानंतर संसद परिसरात सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी आपसात बोलत होते. यावेळी उपस्थित पत्रकारांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर सोनिया गांधींना प्रश्न विचारले. सोनिया गांधींना प्रश्न विचारताच गांधी घराण्याचे राजपुत्र राहुल गांधींनी राष्ट्रपतींच्या भाषणाला कंटाळवाणे म्हटले. ते म्हणाले की राष्ट्रपती जुन्याच गोष्टी पुन्हा सांगत आहेत.

यानंतर सोनिया गांधी म्हणाल्या की, ‘’शेवटी राष्ट्रपती खूप थकल्यासारख्या वाटत होत्या. त्या बोलूही शकत नव्हत्या, बिचाऱ्या… (पुअर लेडी)’’ त्यांच्या या च वक्तव्याचे सध्या जोरदार पडसाद उमटताना दिसत आहेत. अनेकांनी त्यांच्या या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली. भाजपने सुद्धा गांधी परिवाराला चांगलंच घेरले आहे. त्यावरचा हा खास व्हिडिओ