धक्कादायक! मुंबईतील साठ्ये कॉलेजमध्ये विद्यार्थीनीची आत्महत्या

मुंबईच्या विलेपार्ले येथील साठ्ये कॉलेजमध्ये शिकणाऱ्या २१ वर्षीय तरुणीने कॉलेजच्या इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, २१ वर्षीय मुलीचा मृतदेह आढळल्यानंतर साठे कॉलेजमध्ये खळबळ उडाली आहे. मृत मुलगी त्याच कॉलेजमध्ये शेवटच्या वर्षाची विद्यार्थिनी होती.

कॉलेज प्रशासनाने तिच्या कुटुंबियांना सांगितले की, तिचा मृत्यू तिसऱ्या मजल्यावरुन पडल्याने झाला. संध्या पाठक अस मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. मुलीनी टोकाचा पाऊल का उचलला यासंदर्भात विलेपार्ले पोलिसांनी एडीआर दाखल करून पुढील तपास करत आहेत तर शाळेत असलेल्या सीएसटीव्हीचा तपास करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here