जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथे दहशतवादी हल्ला झाला आहे. दहशतवाद्यांनी यावेळी पर्यटकांना लक्ष्य केलं. या गोळीबारात 12 लोक जखमी झाले आहेत. यामधील चौघांची प्रकृती गंभीर आहे, तर एकाचा मृत्यू झाला आहे. या हल्ल्यात फक्त लोकच नाही तर घोडेही जखमी झाले आहेत. त्यांनाही गोळ्या लागल्या आहेत.
दहशतवाद्यांना पकडण्यासाठी सर्च ऑपरेशन सुरु करण्यात आलं आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, दोन ते तीन हल्लेखोर पोलीस आणि लष्कर जवानांच्या गणवेशात होते. काश्मीरमधील काही ठिकाणी दहशतवाद दिसत नाही आणि पहलगाम त्यातीलच एक आहे. येथे पर्यटक मोठ्या संख्येने येत असतात. मार्चमध्ये झालेल्या बर्फवृष्टीनंतर येथे पर्यटकांच्या रांगा लागल्या आहेत. पहलगाम येथे पर्यटक एका डोंगरावर ट्रेकिंगसाठी येतात. तिथेच हा हल्ला झाला आहे. दहशतवादी तिथे लपून बसले होते. त्यांनी पर्यटकांवर गोळीबार केला.