पंतप्रधान मोदींमुळे भारतीय तरुणांना मिळणार सुवर्णसंधी, वाचा नेमकी बातमी काय?

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन दिवसीय अमेरिका दौऱ्यामुळे भारतीय तरुणांना नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे. या दौऱ्यात नरेंद्र मोदींनी टेस्लाचे संस्थापन एलॉन मस्क यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर भारतातील तरुणांसाठी टेस्ला कंपनी भारतात नोकरभरती करण्याच्या विचारात आहे. यासंदर्भात त्यांनी लिंक्डइन पेजवर जाहीरात केली आहे. महत्त्वाचं म्हणजे मुंबई आणि दिल्लीतील तरुणांना टेस्लामध्ये काम करण्याची सुवर्ण संधी मिळणार आहे.

टेस्ला मुंबईत कोणत्या पदासाठी भरणार जागा?
लिंक्डइन पेजवरील जाहिरातीनुसार कस्टमर सर्व्हिस आणि बॅकएंड कामांसाठी ते १३ पदे भरणार आहेत. तसंच, सेवा तंत्रज्ञ आणि विविध सल्लागार भूमिकांसह किमान पाच पदे मुंबई आणि दिल्ली या दोन्ही ठिकाणांहून भरण्यात येणार आहेत. तर उर्वरित पदे, जसे की कस्टमर एंगेजमेंट मॅनेजर (customer engagement manager) आणि वितरण ऑपरेशन्स विशेषज्ञ (delivery operations specialist) मुंबईतून भरण्यात येणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here