बीडमधल्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांना अडकवण्यासाठी एका महिलेला तयार करण्यात आलं होतं आणि या महिलेची आठ दिवसांपूर्वी हत्या करण्यात आल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांनी केला आहे. या आरोपामुळे पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.
संतोष देशमुखांवर अनैतिक आरोप करण्यासाठी तयार आसलेली कळंब शहरातील द्वारका नगर मधे राहत आसलेल्या महिलेची ७ ते ८ दिवसांपूर्वी हत्या झाल्याचे कळतंय. बीड पोलीसांना ही बातमी कळली त्यानंतर ते घटना स्थळी पोहचल्यावर नंतरच तेथील रहिवासी व स्थानिक पोलिसांना कळली व अजून याबाबत अधिकृत माहिती समोर आली नसून संतोष देशमुख हत्या प्रकरणातील काही धागेदोरे हाती लागू नये म्हणून ही हत्या झाली की अनैतिक संबधातून हत्या झाली अशी चर्चा सध्या सुरू आहे.