ईव्हीएमवर दिसणार महिलांची दोन्ही नावे, जाणून घ्या निवडणूक आयोगाचा निर्णय काय?

निवडणूक आयोगाने यावेळी महिलांसाठी महत्वाचा निर्णय घेतला आहे. महिला उमेदवारांच्या दोन्ही माहेरच्या आणि सासरच्या नावाचा देखील समावेश इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन EVM वर केला जाणार आहे. आतापर्यंत कोणत्याही उमेदवाराचे EVM वर फक्त मतदार यादीतील नावच छापले जात होते. त्यामुळे अनेक विवाहित महिलांना आपले सासरचे आडनाव वापरण्याची इच्छा असूनही त्यांच्या मतदार यादीतील माहेरच्या नावामुळे ईव्हीएमवर सासरचे नाव दाखवता येत नव्हते.

आता निवडणूक आयोगाने घेतलेल्या नव्या निर्णयामुळे अशा महिला उमेदवारांना दोन्ही आडनावे माहेरचे आणि सासरचे एकत्र EVM वर दाखवण्याची परवानगी मिळणार आहे. सासरचे नाव कंसात देण्यात येईल. ईव्हीएमवर नाव छापण्यासाठी मर्यादित जागा असते. त्यामुळे दोन्ही नावं देण्यात येणार असली तरी ती त्या जागेत बसतील इतकीच लांबी असावी लागणार आहे. म्हणजेच संक्षिप्त स्वरूपात दोन्ही नावे दिली जाणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here