मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमुळे यावेळी मिळणार नाही आनंदाचा शिधा

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमुळे इतर काही योजना बंद करण्याची नामुष्की सरकारवर आली आहे. लाडकी बहीण योजनेमुळे यंदा दिवाळीला आनंदाचा शिधा मिळणार नाही. सरकारच्या तिजोरीवर ताण पडत असल्याने यंदा आनंदाचा शिधा लाभार्थ्यांना मिळणार नसल्याची माहिती अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिली.

मुख्यमंत्री लाडकी बहीण या लोकप्रिय योजनेवर वर्षाला सरकारच्या तिजोरीवर 45 हजार कोटी रुपयांचा भार पडत आहे. लाडक्या बहिणींना दरमहा हप्ता देण्यासाठी सामाजिक न्याय विभागाचा आणि आदिवासी विभागाचा निधी वळवण्यात आला आहे. लाडकी बहीण योजनेमुळे आतापर्यंत अनेक योजनांवर परिणाम झाल्याचे पाहायला मिळाले आहे. “लाडकी बहीण योजनेवर वर्षाला 45 हजार कोटी रुपये खर्च होतात, त्यामुळे इतर योजनांवर काही प्रमाणात परिणाम होत आहे. सध्या तिजोरीवर ताण असल्याने यंदा आनंदाचा शिधा मिळणार नाही. आगामी काळात आर्थिक परिस्थिती सुधारल्यास आनंदाचा शिधा पुन्हा सुरू करण्याबाबत निर्णय घेतला जाईल’, असे मंत्री छगन भुजबळ म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here