औरंग्या प्रेमी गाईडला पर्यटकांनी दाखवला इंगा!

छावा चित्रपट आला आणि आजपर्यंत किती खोटा इतिहास आपल्याला शिकवला गेला याची जाणीव झाली. आपली छत्रपती संभाजी महाराजांच शौर्य, त्याचं बलिदान आज आपल्यासमोर आलं. आपल्याला जो इतिहास शिकवलं त्यात औरंगजेब मोठा केला. मुघल बादशाह कसे चांगले होते, हे दाखवण्याचा सातत्याने प्रयत्न केला गेला. अजूनही अनेक लोकांचं औरंगजेबा वरच प्रेम काही कमी होत नाही. अशीच एक घटना समोर आली.

छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आग्रा किल्ल्यावर विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. शिवजयंतीच्या दुसऱ्या दिवशी एक गट आग्रा किल्ल्यावर आला. त्यांनी युपी टुरिझमच्या सागीर बेगला गाईड म्हणून सोबत घेतलं. त्याने प्रथम आग्रा किल्ल्याची माहिती दिली. छत्रपती शिवाजी महाराजांना आग्रा किल्ल्यात कशा प्रकारे ठेवलं होतं हे सांगितला. पण हे सांगताना औरंगजेबाला महान शासक सांगितलं आणि आपल्या राजांबद्दल चुकीची माहिती दिली. पर्यटकांनी त्या गाईडला चांगलाच इंगा दाखवला. त्याला आग्रा किल्ल्यातून बाहेर काढून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर माफी मागायला लावून नाक घासायला लावलं. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. त्याने नाक घासून माफी मागितली खरी पण सुरुवातीला तो माफी मागायला काही तयार नव्हता. पण शिवप्रेमी पर्यटकांनी चांगलाच धडा शिकवला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here