तुळजापूरच्या तुळजाभवानी मंदिरातील शस्त्र पूजनाची तलवार गहाळ झाल्याचा आरोप पुजाऱ्यांनी केला होता. याबाबत मंदिर संस्थानावर नाराजीही व्यक्त केली होती. आता अखेर भाविकांसाठीसुद्धा महत्त्वाच्या असणाऱ्या आणि देवीच्या आयुधांपैकी एक असणाऱ्या या तलवारीसंदर्भात मोठी माहिती समोर आली आहे.
तुळजाभवानी मंदिरातील शस्त्र पूजनाची तलवार सुरक्षित, तलवार गहाळ झाल्याची अफवा असल्याचं तुळजाभवानी मंदिर संस्थानचा लेखी खुलासा समोर आला आहे. तलवार दैनंदिन पूजेसाठी वकोजी बुवा मठात ठेवली असल्याची माहितीची संस्थाननं यावेळी जारी केली.