छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका ‘देवमाणूस’ या मालिकेचा तिसरा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही दिवसांपूर्वी या मालिकाचा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला होता.
‘देवमाणूस’ ही मालिका येत्या २ जूनपासून रात्री १० वाजता झी मराठी’वर पाहता येणार आहे. या आधी या मालिकेचे दोन भाग प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. या मालिकेत अभिनेता किरण गायकवाड हा महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. या मालिकेत किरण गायकवाडसोबत आणखी एक अप्रतिम अभिनेता दिसणार आहे. आता तुम्ही म्हणत असाल का हा कोण तर हा अभिनेता दुसरा कोणी नसून माधव अभ्यंकर आहेत. ‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेतून सगळ्यांच्या मनात घर करणारे अण्णा नाईक हे आता ‘देवमाणूस’ च्या तिसऱ्या सीझनमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. आता प्रेक्षकांचे दोन आवडते खलनायक म्हणजे अण्णा नाईक आणि देवमाणूस एकत्र दिसणार आहेत.