सात वर्षांपूर्वी मुंबई महानगरपालिकेने 27 कोटी रुपये खर्चून गोरेगाव पश्चिम येथील वीर सावरकर उड्डाणपूल बांधला होता. आता हाच पूल महापालिका जमीनदोस्त करणार आहे. हा उड्डाणपूल मुंबई कोस्टल रोडच्या दुसऱ्या टप्प्यातील प्रकल्पाच्या आड येत असल्याने हा उड्डाणपूल पाडणे आवश्यक असल्याचे मुंबई महापालिकेचे म्हणणे आहे.
जर हा पुल पाडला तर मोठ्या प्रमाणात वाहतुक कोंडीचा सामना करावा लागू शकतो. हा पूल गोरेगाव आणि मलाड हा परिसर थेट द्रुतगती महामार्गाला जोडतो. त्यामुळं प्रवास 10 मिनिटांत शक्य होतो. नाहीतर या प्रवासासाठी 45 मिनिटांचा कालावधी लागतो.