राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक प्रकियेला ऑक्टोबर अखेर नंतर सुरुवात होणार आहे. पुढील चार महिन्यात टप्प्याटप्प्याने निवडणूक प्रक्रिया संपणार असल्याची माहिती निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिली आहे. तसेच स्थानिक यावेळी निवडणुकीसाठी व्हीव्हीपॅट मशीन नसणार असंही निवडणूक आयुक्तांनी सांगितलं. यामुळे मतदान केल्याची पावती मिळणार नाही.
व्हीव्हीपॅट मशीन म्हणजे ‘व्होटर व्हेरिफायबल पेपर ऑडिट ट्रेल’ म्हणजे ‘खात्रीदर्शक मतदान पावती यंत्र’. मतदारांनी मतदान केल्यानंतर व्हीव्हीपॅट मशीनमधून पावती बाहेर येते. या पावतीमुळे मतदान केल्याची खात्री होते.