देशात अनेक प्रवासी रेल्वेने प्रवास करतात. प्रवासादरम्यान काहीही तक्रार असली की रेल्वे मदत ॲप वर तक्रारी करतात. या तक्रारींचे तात्काळ निवारण कारण्यात पश्चिम रेल्वे देशात पहिल्या क्रमांकावर आहे. गेल्या एप्रिल महिन्यात तक्रार निवारण्याचे प्रमाण ८.२९ टक्के होते. त्यात आता ४० टक्यांनी घट होउन हे प्रमाण फेब्रुवारी महिन्यात ४.९७ टक्यांवर आले आहे. रेल्वे मदत ॲपद्वारे दररोज प्राप्त होणाऱ्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी सर्वाधिक प्राधान्य दिले जाते. प्रवासादरम्यान प्रवासी खानपान सेवा, तिकिट चेकिंग आणि इतर बाबींबाबत रेल्वेच्या रेल मदत ॲप वर तक्रारी करतात.
पश्चिम रेल्वेने सर्व सहा विभागांमध्ये रेल्वे मदत सेवेसाठी ‘वॉर रूम’ स्थापन केला आहे. रिअलटाइम आधारावर प्रवाशांच्या तक्रारी किंवा समस्यांवर लक्ष ठेवले जाते. पश्चिम रेल्वेने २०२३ मध्ये जवळपास ४७,१२० तक्रारींसह ११७० दशलक्षाहून अधिक प्रवाशांना हाताळले .२०२४ मध्ये, सुमारे १२४७ दशलक्ष प्रवासी आणि ४१६८० तक्रारीचे निवारण केले.