आज सोन्याचे दर काय? घ्या जाणून

सोन्याच्या किंमतीत आज सलग दुसऱ्या दिवशी घसरण झाली आहे. MCXवर सोन्याच्या दरात घट झाली आहे. तर चांदीची चमकही फिकी पडू लागली आहे. दोन दिवसातच सोन्याच्या दरात झालेल्या घसरणीचा परिणाम सराफा बाजारात पाहायला मिळतोय.

सराफा बाजारात सोनं ११० रुपयांनी घसरलं आहे. तर चांदी आज १,०७,००० रुपये प्रति किलोवर स्थिरावली आहे. आज २४ कॅरेट प्रतितोळा सोनं ९७,५८० रुपयांवर पोहोचले आहे. तर २२ कॅरेट सोन्याच्या दरात १०० रुपयांची घसरण झाली आहे. त्यामुळं प्रतितोळा सोनं ८९,४५० रुपयांवर स्थिरावलं आहे. १८ कॅरेट सोन्याच्या दरात ८० रुपयांची घसरण झाली आहे त्यामुळं ७३,१९० रुपये प्रतितोळा सोनं झालं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here