अहमदाबाद एअर इंडिया विमान दुर्घटनेप्रकरणी प्री शेड्युलिंग आणि रोस्टरिंगमध्ये गंभीर निष्काळजीपणा केल्याबद्दल डीजीसीएने एअर इंडियाच्या तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांना जबाबदार धरलं आहे. यामध्ये चुरा सिंग (विभागीय उपाध्यक्ष), पायल अरोरा (क्रू शेड्युलिंग-प्लॅनिंग) आणि पिंकी मित्तल (चीफ मॅनेजर, क्रू शेड्युलिंग) यांचा समावेश आहे. २७ वर्षांचा अनुभव असलेल्या पिंकी मित्तल यांना या अपघातासाठी जबाबदार धरण्यात आल्याने अनेक प्रश्न निर्माण होतात. असे काय झाले की इतक्या दीर्घ कारकिर्दीचा अनुभवही अपयशी ठरला? असा प्रश्न विचारला जातोय.
पिंकी मित्तल एअर इंडियामध्ये मुख्य व्यवस्थापक (क्रू रोस्टरिंग) म्हणून काम करत होत्या. त्यांना विमान वाहतूक उद्योगात 27 वर्षांहून अधिक अनुभव आहे. ज्यामध्ये त्यांनी क्रू शेड्युलिंग, ऑपरेशन्स मॅनेजमेंट आणि टीम लीडरशिप यासारख्या क्षेत्रात तिची तज्ज्ञता सिद्ध केली आहे. पिंकी त्यांच्या कामात प्रामाणिकपणा, गोपनीयता आणि जबाबदारीला प्राधान्य कायम देताना दिसतात.
मग असे काय झाले जे त्यांना जबाबदार धरले जात आहे? तर त्या प्रश्नाचे उत्तर असे दिले जात आहे.मित्तल यांच्या देखरेखीखाली, पायलट आणि क्रू जोड्या नियमांनुसार न बसणाऱ्या बनवण्यात आल्या. योग्य पात्रता किंवा मंजुरीशिवाय क्रूंना एकत्र उड्डाण करण्यासाठी पाठवण्यात आले. तसेच उड्डाणापूर्वी क्रूला आवश्यक असलेली विश्रांती देण्यात आली नाही, ज्यामुळे त्यांच्या कार्य क्षमतेवर परिणाम झाला. तसंच, काही प्रकरणांमध्ये परवाना मानकांकडेही दुर्लक्ष करण्यात आले. डीजीसीएचे म्हणणे आहे की ही एक वेळची चूक नव्हती तर मित्तल यांच्या देखरेखीखाली दीर्घकाळ चालणाऱ्या प्रक्रियेचे अपयश होते. वेळापत्रक आणि तपासणीत वारंवार त्रुटी राहिल्या, ज्यामुळे उड्डाण सुरक्षेवर परिणाम झाला.