बीडमध्ये महिलेला निर्दयीपणे मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. काठी आणि रबरी पाईपनं महिलेला बेदम मारण्यात आलं. बीडच्या अंबाजोगाई तालुक्यातील सेनगावात ही धक्कादायक घटना घडली असून सरपंचासह 10 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आली आहे. महिलेने फक्त तक्रारी केल्या म्हणून तिला मारहाण करण्यात आली. अमानुष मारहाणीचे छायाचित्र व्हायरल होतात राज्यभरात संताप व्यक्त केला जा आहे.
बीडच्या अंबाजोगाई तालुक्यातील सेनगाव येथील ज्ञानेश्वरी अंजान या महिलेला सरपंच व इतर दहा जणांनी १४ एप्रिल रोजी लाकडी काठी व रबरी पाईपने मारहाण केली या प्रकरणात वडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी फरार आहेत. दरम्यान अतिशय अमानुषपणे ही मारहाण करण्यात आली असून फोटो व्हायरल झाले आहेत. यामध्ये महिलेच्या संपूर्ण शरिरावर जखमा दिसत आहेत. या प्रकरणातील आरोपींना तात्काळ अटक करावी अशी मागणी पुढे येत असून वडगाव पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत..