सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये जबरदस्तीने प्रवेश करण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना २० मे रोजी घडल्याचे सांगितले जातंय. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीचे नाव जितेंद्र कुमार असून तो छत्तीसगडचा रहिवासी आहे. सुरक्षा रक्षकांपासून वाचण्यासाठी तो कारमध्ये लपून अपार्टमेंटमध्ये घुसला. 23 वर्षीय जितेंद्र कुमार सलमान खानला भेटण्यासाठी गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये पोहोचला होता, अशी माहिती पोलिसांनी दिली.
सुरक्षेपासून वाचण्यासाठी त्याने कोणाच्या तरी गाडीमागे लपून इमारतीत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. पण सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्याला वेळीच पकडले.
सुरक्षेच्या कारणास्तव अभिनेता सलमान खानला आधीच पोलीस संरक्षण आहे. असे असूनही आरोपी तरुणाने सुरक्षा नियमांकडे दुर्लक्ष केले आणि पोलीस आणि रक्षकांची नजर चुकवून जबरदस्तीने अपार्टमेंटमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. या गंभीर प्रकारानंतर पोलिसांनी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केलाय.