मॉकड्रिलसाठी तरुणाने लग्न दोन तास पुढे ढकललं

भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध झालं तर नागरिकांनी काय सतर्कता बाळगळी पाहिजे याचे धडे स्थानिक प्रशासनामार्फत देण्यात आलेल्या मॉक ड्रीलमध्ये अनेकांनी वाढत्या भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर आवर्जून सहभाग नोंदवला. याच मॉक ड्रीलमध्ये सहभागी होण्यासाठी बिहारमधील एका तरुणाने चक्क आपलं लग्न पुढे ढकलल्याची बातमी समोर आली आहे.

बिहारमधील या तरुणाने देशभक्तीला प्राधान्य देत स्वत:चं लग्न दोन तास पुढे ढकललं. सुशांत कुशावाह असं या तरुणाचं नाव असून तो पुर्णिया जिल्ह्यातील रहिवाशी आहे. सुशांत ७ मे रोजी सायंकाळी सहा वाजता त्याच्या होणाऱ्या पत्नीच्या घरी आरारीया जिल्ह्यात वरात घेऊन जाणार होता. घरापासून ४० किलोमीटरवर असलेल्या सासरवाडीला जाण्यासाठी सुशांतने घर सोडण्याचा आणि मॉक ड्रीलचा क्षण एकाच वेळी आला. त्यामुळेच सुशांतने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का देत लग्नाऐवजी देशहिताला प्राधान्य दिलं. सुशांत घरच्यांसहीत स्थानिक प्रशासनाने नियोजन केलेल्या मॉक ड्रीलमध्ये सहभागी झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here