नुकत्याच लागलेल्या यूपीएससी निकालात शक्ती दुबे यांनी ऑल इंडिया रॅंकिंगमध्ये पहिला क्रमांक पटकावलाय. दरवर्षी लाखो तरुण यूपीएससी देतात. त्यात काहींना यश मिळतं तर काहींना यश हुलकावणी देतं. पण शक्तीने यूपीएससीने टॉप केलंय. पण यासाठी शक्तीने कोणती स्टॅटर्जी वापरली जाणून घेऊया.
7 वर्षांची तयारी, 4 वेळा अपयश आणि शेवटी सुवर्ण यशाच्या इंद्रधनुष्यात विणलेल्या शक्तीने आयएएस-आयपीएस देणाऱ्या प्रयागराजचं नाव देशभरात पोहोचवलं. नागरी सेवा परीक्षा- 2024 मध्ये 2 गुणांनी अनुत्तीर्ण झाल्यानंतर आता सर्व काही संपलय, असे तिला वाटले. परंतु तिने हार मानली नाही. काही काळानंतर तिने नवीन उर्जेने ध्येयाकडे वाटचाल केली. ज्यामुळे तिला यश मिळाले. शक्ती दुबेने आपल्या यशाचं सिक्रेट सर्वांसमोर शेअर केलंय. यावेळी मुलाखत गेल्या वर्षीपेक्षा चांगली झाली. मला प्रयागराज महाकुंभ, भारत-चीन आणि भारत-नेपाळ संबंधांवर प्रश्न विचारण्यात आले. माझ्या आवडी आणि चालू घडामोडींशी संबंधित अनेक प्रश्न विचारण्यात आले. मुलाखतीसाठी मी स्वतःला अपडेट ठेवले आणि माझे विचार स्पष्टपणे व्यक्त करण्याचा सराव केला होता, असे शक्ती सांगते. माझी तयारी एकांतात झाली. माझे फार मोठे मित्रमंडळ नव्हते. मी स्वतःला पुस्तके, शिक्षक आणि कुटुंबाच्या मार्गदर्शनापुरते मर्यादित ठेवले. फाउंडेशन कोर्सनंतर जेव्हा मी शिक्षकांच्या संपर्कात आले, तेव्हा मला समजले की योग्य मार्गदर्शन ही यशाची गुरुकिल्ली आहे, असेही शक्तीने पुढे सांगितले. शक्तीचा हा पाचवा प्रयत्न होता आणि ती त्या 7 वर्ष तयारी करत होत्या. प्रत्येक अपयशानंतर, मी माझी चूक ओळखली आणि पुढच्या वेळी त्यावर लक्ष केंद्रित केले. तुम्हाला तुमच्या कमकुवतपणा स्वीकाराव्या लागतील, तरच तुम्ही यशाकडे वाटचाल करू शकाल, असेही शक्तीने सांगितले.