क्षेपणास्त्र तंत्रज्ञानात भारतीय सैन्याने लक्षवेधी झेप घेतली आहे. भारताने 24 तासात ट्रिपल मिसाईल टेस्ट केली आहे. भारताने तीन महत्त्वाच्या क्षेपणास्त्रांची यशस्वी चाचणी केली आहे. भारताने आकाश प्राइम, अग्नि-1 आणि पृथ्वी-2 या 3 क्षेपणास्त्रांची यशस्वी चाचणी घेतली.
संरक्षण मंत्रालयाने क्षेपणास्त्रांच्या यशस्वी चाचणीची माहिती दिली. भारताने पृथ्वी- 2 आणि अग्नि- 2 या कमी पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांची चाचणी घेतली आहे. दोन्ही क्षेपणास्त्रांचे चाचणी प्रक्षेपण पूर्णपणे यशस्वी झाले. या चाचण्या ओडिशातील चांदीपूर येथील एकात्मिक चाचणी श्रेणी (ITR) मधून घेण्यात आल्या. दोन्ही क्षेपणास्त्र चाचण्या स्ट्रॅटेजिक फोर्सेस कमांड (SFC) च्या देखरेखीखाली घेण्यात आल्या. लडाखमध्ये आकाश प्राइमची चाचणी घेण्यात आली.