बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाचा पहिला टप्पा १५ ऑगस्टपर्यंत पूर्ण होणार आहे. म्हणजेच बीडीडीकरांना लवकरच घरांच्या चाव्या मिळणार आहेत. त्यामुळे त्यांचे नव्या घरातच गणेशोत्सव साजरा होण्याचे स्वप्न आता पूर्ण होणार आहे. या पुनर्विकास प्रकल्पांतर्गत वरळी, नायगाव आणि अन्य परिसरातील जुन्या चाळींचे आधुनिक इमारतींमध्ये रूपांतर केले जात आहे.
पहिल्या टप्प्यात सुमारे ३ हजार रहिवाशांना नवीन आणि सुसज्ज घरे मिळणार आहेत. या घरांमध्ये आधुनिक सुविधा जसे की स्वच्छ पाणी, वीज, स्वच्छतागृहे आणि लिफ्ट यांचा समावेश आहे.