बंडखोर आमदारांबाबत सुप्रीम कोर्टाचे ताशेरे

तेलंगणात 10 आमदारांनी निवडणूक एका पक्षातून लढवली आणि विजयानंतर दुसऱ्या पक्षात प्रवेश केला. आता या आमदारांच्या सदस्यत्वावर आता टांगती तलवार आहे, कारण हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात असून न्यायालयाने याबाबत कठोर निर्णय घेतला आहे.

2023 मध्ये झालेल्या तेलंगणा विधानसभा निवडणुकीत भारत राष्ट्र समिती (BRS, पूर्वीची तेलंगणा राष्ट्र समिती – TRS) चा पराभव झाला. काँग्रेसने बहुमत मिळवत सरकार स्थापन केले. निवडणुकीनंतर अवघ्या काही महिन्यांतच BRS चे 10 आमदार काँग्रेसमध्ये सामील झाले. यापैकी एका आमदाराने 2024 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूकही लढवली.

निकाल देताना सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की, अशा प्रकरणांवर वेळेत निर्णय न झाल्यास लोकशाही धोक्यात येऊ शकते. न्यायालयाने उदाहरण देत म्हटले, “शस्त्रक्रिया यशस्वी झाली, पण रुग्ण दगावला,” म्हणजेच उशिरा निर्णयामुळे त्याचा परिणाम नष्ट होऊ शकतो. माजी खासदार आणि नेत्यांच्या विधानांचा दाखला देत न्यायालयाने सांगितले की, पक्षांतरविरोधी कायदा लोकशाहीचा पाया मजबूत करण्यासाठी बनवला गेला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here