कोल्हापूरच्या नांदणीतील महादेवी हत्तीण वनतारामध्ये नेल्यानंतर मराठी कलाकार देखील महादेवी हत्तीणीसाठी पुढे आले आहेत. ज्यामध्ये किरण माने यांनी देखील महादेवी हत्तीणीसाठीबाबत एक पोस्ट शेअर केली आहे.
एका मुक्या जीवाच्या भावनेशी जिवघेणा खेळ खेळला गेलाय. ‘वनतारा’ वाल्यांना एक प्रशिक्षित हत्ती हवा होता. संपूर्ण भारतात शोध घेतल्यावर त्यासाठी त्यांना दोन हत्तीणी पसंत पडल्या. त्यातली एक केरळची होती. केरळवाल्यांनी ती द्यायला साफ नकार दिला. मग हे ‘व्यापारी’ नांदणीत आले. तिथल्या महादेवी उर्फ माधुरीसाठी त्यांनी ‘सौदा’ करायचा प्रयत्न केला. “आम्हाला ही प्रशिक्षित हत्तीण हवी आहे” म्हणत पैशांचं आमिषही दाखवलं. पण अख्ख्या नांदणीचा जीव असलेली माधुरी ते कशी विकतील? मग या स्टोरीत ‘ड्रामा’ आला. ‘पेटा’ नांवाच्या कॅरॅक्टरची एंट्री झाली. पेटाचे डॉक्टर्स अचानक माधुरीला तपासायला आले आणि त्यांनी सांगितलं की ‘माधुरीच्या पायाला इजा आहे. इथे तिच्या तब्येतीची हेळसांड केली जाते. तिचा जीव धोक्यात आहे.’ मग नांदणीवाल्यांनी त्यांचा डॉक्टर आणला. त्या डॉक्टरांनी सांगितलं माधुरी एकदम ठणठणीत आहे. पेटावाले सांगताहेत तसं काहीही नाहीये. पण पैशापुढं सरकारपासून न्यायव्यवस्थेपर्यंत सगळे झुकले, अशाप्रकारची पोस्ट किरण माने यांनी शेअर केली आहे.