या वर्षी सप्टेंबरमध्ये पुरुषांच्या टी-20 एशिया कपचं आयोजन होणार होतं, पण आता या स्पर्धेवरच रद्द होण्याचे सावट निर्माण झालं आहे. भारत आणि श्रीलंका क्रिकेट बोर्डाने घेतलेल्या एका निर्णयामुळे एशिया कपच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. सप्टेंबरमध्ये होणाऱ्या आशिया कप २०२५ वर संकटाचे ढग अधिकच दाटून येत आहेत. टेलिकॉम एशिया स्पोर्टच्या वृत्तानुसार, सहा देशांच्या या स्पर्धेला सुरुवात होण्यासाठी दोन महिन्यांपेक्षा कमी कालावधी शिल्लक असताना दोन्ही बोर्डांनी हा निर्णय घेतला आहे. जरी एसीसीने बैठक नियोजित वेळेनुसार होईल याची पुष्टी केली असली तरी, भारत आणि श्रीलंकेच्या अनुपस्थितीमुळे स्पर्धेचे भवितव्य धोक्यात आले आहे.
एशियाई क्रिकेट परिषद (ACC) ची महत्त्वपूर्ण बैठक २४ जुलै रोजी बांग्लादेशची राजधानी ढाकामध्ये होणार आहे. मात्र बीसीसीआय (भारतीय क्रिकेट मंडळ) आणि श्रीलंका क्रिकेट बोर्डाने या बैठकीसाठी प्रत्यक्ष उपस्थित राहण्यास नकार दिला आहे. त्यामुळे एशिया कप २०२५ चं आयोजनच धोक्यात आल्याची शक्यता वर्तवली जात आहे.