संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये वक्फ सुधारणा विधेयक सादर करण्यात आले. राज्यसभा आणि लोकसभा दोन्ही सभागृहामध्ये हे विधेयक देखील मंजूर झाले आहे. वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी स्वाक्षरी देखील केली आहे. आता या वक्फ कायदा लागू झाल्यानंतर देशात पहिली कारवाई करण्यात आली आहे.
वक्फ बोर्डच्या कायद्यानुसार, पहिली कारवाई करण्यात आली आहे. मध्यप्रदेशमध्ये ही पहिली कारवाई करण्यात आली आहे. मध्य प्रदेशातील पन्ना याठिकाणी ही कारवाई करण्यात आली आहे. याठिकाणी प्रशासनाने सरकारी जमिनीवर बांधलेला बेकायदेशीर मदरसा पाडण्यात आला आहे. या मदरशावर बुलडोझर वापरला जाणार होता, पण बुलडोझर वापरण्यापूर्वीच, संचालकाने स्वतः मदरसा पाडला. मुस्लिम समुदायानेच सरकारी जमिनीवर बेकायदेशीरपणे चालणाऱ्या या मदरशाची तक्रार केली होती. त्याची चौकशी केली असता तक्रार खरी असल्याचे निष्पन्न झाले. स्थानिक लोकांनी सांगितले की, अब्दुल रौफ कादरी हा बाहेरचा माणूस आहे. तो १० वर्षांपूर्वी इथे आला होता. त्याने ही जागा ताब्यात घेतली आणि सरकारी जमिनीवर बेकायदेशीरपणे मदरसा बांधला. त्याने गरीब मुलांच्या नावाने देणग्या गोळा करण्यास सुरुवात केली. द्रौपदी मुर्मू यांनी यावर सही केल्यामुळे याचे कायद्यामध्ये रुपांतर झाले. या नवीन कायद्याने पहिली कारवाई करण्यात आली.