ऑपरेशन सिंदूरचा भाग असल्याने मला पत्नीच्या हत्येतून सूट द्या!

पत्नीच्या हत्येच्या प्रकरणात ब्लॅक कॅट कमांडोला दिलासा देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. मी ऑपरेशन सिंदूरचा भाग होतो, असा युक्तीवाद कमांडोने न्यायालयात केला.

ऑपरेशन सिंदुरमध्ये सहभागी असल्याने तुम्हाला प्रतिकारक शक्ती मिळत नाही. कमांडो असल्याने पत्नीच्या हत्येच्या आरोपातून सूट देता येत नाही, असे न्यायालयाने म्हटले. आरोपीने ज्या भयानक पद्धतीने आपल्या पत्नीचा गळा दाबून खून केला ते क्षमा करण्यायोग्य नसल्याचे न्यायालयाने म्हटले. कमांडोवर आयपीसीच्या कलम 304B अंतर्गत हुंडा हत्येचा आरोप आहे.

‘यामुळे तुम्हाला इम्युनिटी मिळत नाही. तुम्ही कितीही शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त असलात तरी, तुम्हीच तुमच्या पत्नीचा गळा दाबलाय’, अशा शब्दात न्यायाधीश उज्ज्वल भुईयान यांनी कमांडोला उत्तर दिले. त्याने ज्या पद्धतीने त्याच्या पत्नीची हत्या केली ती खूप ‘भयानक’ होती, त्यामुळे त्याला आत्मसमर्पण करण्यापासून सूट देता येत नाही, असे न्यायालयाने असेही म्हटले. उच्च न्यायालयानेही कमांडोला दिलासा देण्यास नकार दिला होता, असे यावेळी न्यायमूर्ती विनोद चंद्रन म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here