भाजपच्या ‘या’ आमदाराची सहा वर्षांसाठी पक्षातूनच हकालपट्टी!

गेल्या काही दिवसांपासून राजकारणात अनेक घडामोडी घडत आहेत. त्यात आता कर्नाटकातून मोठी राजकीय घडामोड समोर आली आहे. कर्नाटकचे आमदार बसनगौडा पाटील यटनाल यांना भाजपने सहा वर्षांसाठी हकालपट्टी केली आहे. बसनगौडा पाटील यांच्या हकालपट्टीचे कारण आता समोर आले आहे. अलीकडच्या काळात भाजपकडून करण्यात आलेली अशा स्वरूपाची ही पहिलीच कारवाई आहे.

भारतीय जनता पक्षाने (भाजप) आमदार बसनगौडा पाटील यटनाल यांना 6 वर्षांसाठी पक्षातून काढून टाकले आहे. राज्यस्तरीय पक्ष नेतृत्वावर टीका आणि पक्षाच्या सूचनांचे उल्लंघन केल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे. भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) केंद्रीय शिस्तपालन समितीने 26 मार्च रोजी एक पत्रक जारी करून, यटनाल यांच्या पक्ष शिस्तीच्या वारंवार उल्लंघनांना गांभीर्याने घेत ही कारवाई केली. समितीला असे आढळून आले की, यटनाल यांनी वारंवार पक्ष शिस्तीचे उल्लंघन केले होते. त्यामुळे त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here