एकीकडे मुंबई महापालिका निवडणुका तोंडावर असताना अनेक नेते उबाठा गटाला सोडचिठ्ठी देत शिंदे गटात प्रवेश करतायत तर आता दुसरीकडे तोतया प्रवक्त्यांमुळे पुन्हा उबाठाची डोकेदुखी वाढताना दिसतेय. उबाठा नेते संजय गुप्ता यांनी एका युट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीमुळे चांगलीच खळबळ उडाली आहे. उबाठा नेत्या प्रियांका चतुर्वेदी यांच्यावर त्यांनी निशाणा साधला.. त्यांच्या विधानानंतर उबाठा नेते आदित्य ठाकरे यांनी ‘संजय गुप्ता’ यांच्यावर हे पक्षाशी काही संबंध नसताना टीव्ही चॅनल्सवर जाऊन पक्षाची बाजू मांडल्याचा आरोप केला आहे. संजय गुप्ता नेमकं असं काय म्हणाले हे जाणून घेण्यासाठी त्यावरचा खास व्हिडिओ नक्की पहा.