इथे ओशाळली माणुसकी! संतोष देशमुखांच्या विकृत मारेकऱ्यांचा इतिहास

बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण गेल्या अनेक दिवसांपासून आपण ऐकतोय. अतिशय क्रूरपणे अमानुषपणे मारहाण करत त्यांची हत्या करण्यात आली. आता पोलिसांच्या चार्जशीट मधले हत्येच्या वेळचे फोटो बाहेर आले आहेत. ते सगळे फोटो पाहून संपूर्ण महाराष्ट्र हळहळतोय. प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी आहे. इतक अमानुष, क्रूर कोणी वागू शकतं? मारहाण करताना त्यांच्या चेहऱ्यावरच ते घाणेरड, विकृत, राक्षसी हास्य पाहून मन सुन्न होतं. यांना माणूस म्हणायचं का? शक्यच नाही ही माणसं असूच शकत नाही हे हैवान आहेत राक्षस आहेत.. माणुसकी शिल्लक आहे का असा प्रश्न विचारण्याची पण गरज नाही.. माणुसकी संपली, हरली. संतोष देशमुखांची हत्या करताना गळा घोटला माणुसकीचा पण.
आणि कशासाठी खंडणीसाठी, पैशांसाठी, इतक खालच्या थराला जाऊन कोण कसं वागू शकतं. आज त्या माणसाला इतकं हाल हाल करून मारलं पण तिथेही त्याला न्याय देताना राजकारण केलं जातंय. कोणाला तरी वाचवण्याचा प्रयत्न केला जातो. का.. या लोकांना फासावरच लटकवल पाहिजे.
या फोटोंमधले हे सगळे राक्षस यांचा गुन्हेगारी इतिहास आहे. पण यांची वयं पहिली तर सगळे 30 च्या आतले आहेत.. 21, 22, 27 अशी यांची वयं आहेत .. एवढी क्रूरता येते कुठून? यांचा गुन्हेगारी इतिहास पाहुया

जयराम चाटे – वय वर्ष 21, चार्जशीट मधला हा 7 वा आरोपी

संतोष देशमुखांना मारहाण करताना त्यांच्या शर्ट हातात घेऊन हा विकट हसतोय. मारहाण करताना निर्दयीपणे त्यांची पॅट काढणारा हाच तो नराधम. एका फोटोत त्यांना मारहाण करत असताना मोबाईल वर शूट करताना दिसतोय. जयरामने मारहाण होत असताना मोकार पंती या व्हॉट्सॲप ग्रूपवर व्हिडिओ कॉल केला होता.
याआधी याच्यावर खुनाचा प्रयत्न, मारहाणीचे गुन्हे दाखल आहेत. 10 डिसेंबरला याला अटक केली होती.

महेश केदार – वय वर्ष 21, चार्जशीटमध्ये 6 नंबरचा आरोपी

संतोष देशमुख यांना मारहाण होत असताना हा फोनमध्ये फोटो घेतोय. जयराम चाटेने पँट काढली त्याचा फोटो याने घेतला. अतिशय क्रूर, विकट हास्य त्याच्या चेहऱ्यावर दिसतंय. गर्दीत मारामारी, चोरी, खुनाचा प्रयत्न, खुनात सहभाग असे गुन्हे आहेत .CID ने याच्याच फोनमधून 15 व्हिडिओ आणि 8 फोटो जप्त केले.

सुदर्शन घुले – वय वर्ष 27, 3 नंबरचा आरोपी

एका फोटोत हा फोनमध्ये काहीतरी करताना दिसतोय. आणि दुसऱ्या फोटोत संतोष देशमुख यांना मारहाण केल्यानंतर त्यांच्या शेजारी बसून फोटो घेतोय. संतोष देशमुख यांना सुदर्शन घुले हा सगळ्यांचा बाप आहे असंही म्हणायला भाग पाडलं होतं. ऊसतोड मुकादम ते खंडणीखोर असा त्याचा गुन्हेगारीचा आलेख वाढत गेला. त्याला भाई व्हायचं होतं. आपली दहशत निर्माण करायची होती. राजकारणात ही त्याची चांगली ओळख आहे. धमक्या देऊन वसूली करण्याचेच नाही तर चोरी करण्याचा आरोप सुद्धा त्याच्यावर लागलेले आहेत.. हत्येनंतर सुधीर सांगळे, कृष्णा आंधळे यांच्यासोबत पळून गेला होता. मिशी काढली होती, वेषांतर केलं होतं.

प्रतीक घुले – वय वर्ष 24 , चौथ्या नंबरचा आरोपी

याचा अतिशय किळस आणि चीड आणणारा फोटो आहे.संतोष देशमुख अर्धमेल्या अवस्थेत असताना त्यांच्या चेहऱ्यावर हा लघवी करताना दिसतोय. इतका रानटी पणा येतो कुठून.
नंतरच्या फोटोत हातात पाईप आहे.. त्या पाईपने त्यांना मारहाण केली आहे. याच्यावर तर खुनात सहभाग, मारहाण, विनयभंग असे गुन्हे आहेत.

सुधीर सांगळे – वय वर्ष 22, 5 वा आरोपी

हा फरार होता याला जानेवारी महिन्यात अटक केली. संतोष देशमुख यांच्या हत्येत सहभागी असल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कृष्णा आंधळे – वय वर्ष 27, 8 वा आरोपी

हा छत्रपती संभाजीनगरमध्ये पोलिस भरतीची तयारी करत होता. पण गुन्हेगारी जगताकडे वळला. हत्येनंतर हा अजूनही फरार आहे. पोलिस याचा शोध घेत आहेत.

विष्णू चाटे – 2 नंबरचा आरोपी

विष्णू चाटे म्हणजे या केसचा मास्टरमाईंड असलेला वाल्मीक कराडचा मावसभाऊ. त्यानेच 29 नोव्हेंबरला आवादा कंपनीत जाऊन खंडणी मागितली होती. केजच्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा हा तालुका अध्यक्ष होता.संतोष देशमुख यांचं अपहरण हे सुदर्शन घुले याच्या गाडीतून करण्यात आलं तेव्हा याची गाडी पण मागे होती.

वाल्मिक कराड

सुरुवातीपासून या प्रकरणात मास्टर माईंड म्हणून नाव घेतल जात होत. आता एक ऑडिओ कॉल सुद्धा व्हायरल होत आहे. आजपर्यंत अनेक गुन्हे दाखल आहेत. धनंजय मुंडे यांचा अत्यंत जवळचा आणि विश्वासू अशी ओळख.

या घटनेनंतर एक प्रश्न पडतो कायदा आहे का? असेल तर कोणासाठी.. तुमच्या आमच्या सर्व सामान्य लोकांना धाक दाखवायला बहुतेक कायदा आहे. पण हे रानटी जनावर, राक्षस असेच मोकाट फिरतात. बीडचा बिहार होतोय अशी ओरड आपण ऐकतो. पण बिहार नाही त्याहून वाईट अवस्था आहे. धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेऊन काय होणार.. संतोष देशमुख यांना न्याय मिळणार आहे का. यात ज्यांचे ज्यांचे हात त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे. आणि यात जातीपातीचे रंग देऊ नका. माणूस म्हणून बघा. त्या जातीच्या रंगाने सगळा बेरंग केला आहे. हे असे रानटी जनावर आपली आजुबाजूला वावरत असतील तर कस व्हायचं. या अशा मोकाट जनावरांमुळे चांगुलपणा, एखाद्याला मदत करण हे नको वाटतं. कारण मदत करून अशी अवस्था होणार असेल तर काय उपयोग. कायद्याचा धाक वैगेरे सगळं बोलायला आहे. ते काही होत नाही. फक्त माणसाचा चेहरा घेऊन माणुसकी बाजूला ठेवून आपण वावरायचं. हेच आपल्या हातात राहिलं आहे.
आता सरकारमध्ये माणुसकी शिल्लक असेल तर या गिधाडांना शिक्षा होईल.. त्या न्याय देवतेच्या डोळ्यावरची पट्टी काढली कशाला ते कळत नाही.. न्याय व्यवस्था आहे की नाही?आज संपूर्ण महाराष्ट्र संतोष देशमुख यांच्यासाठी न्याय मागतोय. सरकारमध्ये हिमत असेल आणि सर्व सामन्यांच सरकार असेल तर दाखवा अजूनही न्याय मिळतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here