ज्येष्ठ अभिनेते आणि तृणमूल काँग्रेसचे खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी समान नागरी कायद्याचे समर्थन केलं आहे. मात्र समर्थन करत असताना त्यांनी मांसाहारावर एक वक्तव्य केल्याने नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. भारतात नॉन व्हेजवर बंदी घाला असं वक्तव्य त्यांनी केलं. शत्रुघ्न सिन्हा कायमच रोखठोक विधानं करत असतात. आताही नॉन व्हेज संदर्भातील विधानाने नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. लोकांच्या आहाराबाबत केलेल्या विधानाने चर्चांना उधाण आलंय..
गोमांसच नाही तर देशात सर्व प्रकारच्या मांसाहारावर बंदी आणण्याची गरज आहे. भारतात नॉन व्हेजवर बंदी आणली पाहिजे असं खळबळजनक विधान त्यांनी केलं आहे. तसचं त्यांनी उत्तराखंड मध्ये लागू केलेल्या समान नागरी कायद्याच कौतुक केलं आहे. उत्तराखंडमध्ये युसीसीची अंमलबजावणी कौतुकास्पद आहे. संपूर्ण देशात समान नागरी कायदा लागू झाला पाहिजे असं मत त्यांनी व्यक्त केलं.