पहलगाम हल्ल्यानंतर भारत पाकिस्तानमधील तणाव वाढला आहे. भारतात राहणाऱ्या पाकिस्तान, बांगलादेशी या लोकांचा प्रश्न निर्माण झाला आहे. भारतात गेल्या अनेक वर्षांपासून बांगलादेश आणि श्रीलंकामधून अवैधरित्या लोक भारतात येतात. त्यानंतर ते भारताचे नागरिकत्व मागतात. अशात एका श्रीलंकामधील नागरिकाच्या याचिकेवर सुनावणे करताना निर्वासितांनाच्या मुद्दावर सर्वोच्च न्यायालयाने मोठी टीप्पणी केली आहे.
सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणात सुनावणी करताना म्हटलं की, जगभरातील निर्वासितांना भारतात आश्रय का द्यायचा ? भारत काही धर्मशाळा नाही”. “आपण 140 कोटी लोकांसोबत लढत आहोत, त्यामुळं कुठूनही येणाऱ्या निर्वासितांना आश्रय देऊ शकत नाही.” त्यासोबत श्रीलंकेतून आलेल्या तमिळ निर्वासितांच्या ताब्यात घेण्याच्या प्रकरणात हस्तक्षेप करण्यास कोर्टाने नकार दिला आहे. या निर्वासित व्यक्तीच्या जीवाला श्रीलंकेत धोका असल्याने त्याला भारतात राहण्याची परवानगी द्यावी अशी विनंती याचीकर्त्यांच्या वकिलाने सुप्रीम कोर्टाला केली होती.