मुस्लिम महिलेला ‘खुला’ द्वारे घटस्फोट घेण्याचा पूर्ण आणि बिनशर्त अधिकार आहे, असे एका ऐतिहासिक निर्णयात तेलंगणा उच्च न्यायालयाने म्हटले आहे. मुस्लिम महिलांना यासाठी पतीची संमती आवश्यक नाही. ‘खुला’ ही इस्लामिक कायद्यातील एक प्रक्रिया आहे ज्यामध्ये पत्नी हुंडा किंवा मेहर सारख्या आर्थिक गोष्टी सोडून देऊन तिच्या पतीला घटस्फोट देऊ शकते. ही प्रक्रिया नो फॉल्ट म्हणजेच कोणताही कोणत्याही आरोप किंवा दोषाशिवाय आणि नॉन कॉनफ्रंटेशनल कोणत्याही तणावाशिवाय होते.
न्यायाधीश मौसमी भट्टाचार्य आणि बीआर मधुसूदन राव यांच्या खंडपीठाने हा ऐतिहासिक निर्णय दिला. पत्नीने ‘खुला’ करण्याची मागणी खासगी क्षेत्रात त्वरित प्रभावी होते आणि त्यात पतीची संमती आवश्यक नाही. न्यायालयाची भूमिका फक्त या खासगी घटस्फोटाला कायदेशीर मान्यता देण्याची आहे, जेणेकरून ती दोन्ही पक्षांवर बंधनकारक असेल असे खंडपीठाने म्हटले. ‘खुला’ प्रक्रियेत मौलवी किंवा दार-उल-काझा (इस्लामिक धार्मिक न्यायालय) ची कोणतीही कायदेशीर आवश्यकता नसेल असेही ते म्हणाले.
जर महिलेने खुला मागितला असेल आणि ती मेहर परत करण्यास तयार असेल तर कुटुंब न्यायालयाने फक्त औपचारिक पुष्टी करावी लागेल. यावर कोणतीही दीर्घ सुनावणी होणार नाही, असे खंडपीठाने म्हटले.