केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) आज नागरी सेवा परीक्षा २०२४ चा निकाल जाहीर केला. या वर्षी शक्ती दुबेने अव्वल स्थान पटकावलं असून तिच्या पाठोपाठ हर्षिता गोयलचा क्रमांक आहे. पुण्याचा अर्चिंत डोंगरे देशात तिसरा आला आहे. सरकारच्या अधिसूचनेनुसार, या भरती प्रक्रियेद्वारे एकूण ११२९ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यामध्ये भारतीय प्रशासकीय सेवेतील (IAS) १८० पदं, भारतीय परराष्ट्र सेवेतील (IFS) ५५ पदं आणि भारतीय पोलिस सेवेतील (IPS) १४७ पदं समाविष्ट आहेत.
याव्यतिरिक्त, केंद्रीय सेवा गट ‘अ’ मध्ये ६०५ आणि गट ‘ब’ सेवांमध्ये १४२ पदे रिक्त आहेत. निकाल जाहीर झाल्यापासून १५ दिवसांच्या आत वेबसाइटवर गुण उपलब्ध होतील.